Summary of the Book
डॉ. मंगला मिरासदार यांची ही कादंबरी संस्कृत नाटकावरून बेतली आहे. संस्कृत साहित्यात भास यांच्या नाटकांना वेगळे स्थान आहे. "स्वप्नवासवदत्तम्' आणि "प्रतिज्ञा सौगंधरायण' या दोन नाटकांचा आधार या कादंबरीसाठी घेण्यात आला आहे.
सर्व कलांमध्ये प्रवीण असलेल्या राजा उदयन आणि त्याची पत्नी वासवदत्ता यांची ही कथा. राजा उदयनचा स्वामिनिष्ठ अमात्य सौगंधरायण याचे कर्तृत्वही यात उत्तम रेखाटले आहे. प्रासादिक आणि ओघवती भाषा यामुळे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते.