Summary of the Book
भविष्य आणि त्यातही हस्तरेषांवरून सांगितले जाणारे भविष्य हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. प्रत्येकालाच आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. या इच्छेला फुंकर घालण्याचे काम लेखिका कल्पना जानी यांनी नियतीचे प्रतिबिंब या पुस्तकातून केले आहे. केवळ हस्तसामुद्रिकाचे ठोकताळे हा कदाचित रटाळ विषय ठरू शकतो.
त्यामुळेच जानी यांनी या ठोकताळ्यांच्या उपाययोजानेतून आलेला अनुभव असा पुस्तकाचा फॉर्म निवडला आहे. आपल्या सल्ल्यामुळे लोकांचे आयुष्य कसे बदलेल याची कथा सांगतानाच ते आपण कोणत्या ठोकताळ्यांच्या आधारे सल्ला दिला, ते सांगतात. त्यामुळे एकाच वेळी एक गोष्ट वाचण्याचा आणि हस्तसामुद्रिकाचे ठोकताळे जडाणून घेण्याचा असा दुहेरी आनंद वाचकाला मिळतो.