Hard Copy Price:
25% OFF R 650R 487
/ $
6.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
एरॉनॉटिकल इंजिनीअर, रॉकेट सायंटिस्ट, ‘मिसाइल मॅन’ द्रष्टा, शिक्षक आणि सर्वाधिक प्रेरणादायी राष्ट्रपती - अबुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम हे सारे तर होतेच; पण त्याहीपेक्षा बरेच काही होते. ते महात्मा गांधींनंतरचे सर्वाधिक आदरणीय नेता होते, याबाबत काहीच शंका नाही. आपल्या जीवनात आलेल्या मर्यादा आणि अडथळे पार करून ते एक अविस्मरणीय आयुष्य जगले; तेही अगदी नम्रपणाने आणि मोठ्या आदबीने.
डॉ. कलाम यांच्या कारकिर्दीची जडणघडण आणि स्वभाव यांची सर्वंकष माहिती, त्यांच्यासोबतचा दीर्घ काळ काम करण्याचा अनुभव यांच्या सहाय्याने अरुण तिवारी त्यांची जीवन कथा सांगतात. कलाम यांची, त्यांनीच बनवलेल्या क्षेपणास्त्रांप्रमाणेच नाट्यपूर्ण असलेली, अत्युच्चपदाकडील वाटचाल आपल्याला त्यांच्या धडपडीची आणि त्यांनी सोसलेल्या दुःखाचीही ओळख करून देते.
३३ वर्षे इतका दीर्घ काळ डॉ. कलाम यांचे ‘कनिष्ठ सहकारी, सह-लेखक, भाषणे लिहिणारे आणि मित्र’ या नात्याने ते कलाम यांच्या जीवनाचे सारच सांगतात. डॉ. कलाम यांच्यावर पडलेले प्रभाव, त्यांच्या संतपणाच्या सवयी, त्यांचे संस्मरणीय जीवन आणि त्यांचे अचाट कर्तृत्व फुलवणाऱ्या त्यांच्या उत्कट भावना अचूक शब्दबद्ध करतात.
वैयक्तिक आठवणी आणि किस्से यांनी समृद्ध असलेले डॉ. कलाम यांचे हे व्यक्तिचित्र अरुण तिवारी यांनी अतिशय अधिकाराने रेखाटले आहे. त्यातून डॉ. कलाम हे अगदी त्यांच्या देशाप्रमाणेच विविध विरोधाभासांचे मूर्तिमंत उदाहरण कसे होते, ते दाखवून दिले आहे. म्हणजे एकाच वेळी ते सर्वधर्मसमभाव मानणारे आणि धार्मिक विचाराचे, मोठेपणा असलेले आणि विनम्र, आत्यंतिक कार्यशील आणि शांत, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक होते... आणि या सर्वांपेक्षाही महत्वाचे म्हणजे ते सर्वात आधी भारतीय होते.