Summary of the Book
पद्माकर कार्येकर यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. नवखेपणाच्या त्यात कोणत्याही खुणा जाणवत नाहीत. अत्यंत तरल शब्दरचना आणि जीवनातील अनुभवांना आपल्या कल्पनेची जोड देत एक वेगळंच विश्व वाचकासमोर उभं करतात. देश, देव आणि निसर्ग यांच्याबद्दलच्या कविता जशा आहेत, तशा प्रेमाच्या आणि महानगरीय आयुष्यातील धकाधकीच्या जीवनात होणारी घुसमट व्यक्त करणाऱ्याही कविता आहेत. कवीचा ह सं ग्रह पहिलाच असला तरी या कविता वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या काळातल्या आहेत.