आपली सूर्यमाला
eBook Price: 25% OFF  R 110 R 82 / $ 1.05
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
आपल्या सूर्यमालेबद्दल भारतीय संस्कृतीत कुतूहल, आकर्षण, आदर, भीती अशा संमिश्र भावना प्राचीन काळापासून कायम आहेत. सूर्याची महती गाणारे सूर्योपनिषद्, सूर्य स्तोत्रे तर आहेतच पण आपल्या व्यायामात पण सूर्यनमस्काराचे महत्त्व आहे.

चंद्राच्या कला बघून आपण रोजची तिथी, महत्त्वाचे सण निश्चित करतो. सूर्यालिकेतील नवग्रहांची सातत्याने कृपा रहावी म्हणून आपण नवग्रह स्तोत्राचा पाठ नेाने करतो, निरनिराळ्या खड्यांच्या अंगठ्या धारण करतो, उपवास धरतो. आपल्या काव्यात, संगीतात चंद्र, शुक्र ही लोकप्रिय स्फूर्तिस्थाने आहेत व 'चांदोबा चांदोबा भागलास का' या बालगीतापासून शुक्रतारा, मंद वारा---' या प्रेमगीतापर्यंत असंख्य रचना आपल्या मनास भिडल्या आहेत. ह्या वर्षी आपण 'चंद्रयान-१' चंद्राभोवती सोडून' सार्‍या जगाला आश्चर्यचकित केले आहे व भविष्यात मंगळावर स्वारी करण्याचा विचार करीत आहोत. सर्व पार्श्वभूीवर आपली सूर्यमाला कशी आहे?,त्यातील ग्रहांचे स्वरूप कसे आहे? त्यावर मानवाचे संशोधन कसे होत गेले? ह्या सर्व पैलूंवर शास्त्रोक्त माहिती आजच्या पिढीला व्हायला हवी व ही कामगिरी डॉ. मधुकर आपटे यांनी 'आपली सूर्यमाला' हे पुस्तक उत्तम रीतीने
लिहून कुशलतेने पार पाडली आहे.

या पुस्तकात एकूण १८ प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात आपल्या सूर्यमालेबद्दल प्रस्तावना आहे आणि त्यानंतर आपला निर्माता व रक्षणकर्ता सूर्य याबद्दल माहिती दुसर्‍या प्रकरणात दिली आहे. त्यानंतरच्या १० प्रकरणात बुध,शुक्र, पृथ्वी, चंद्र मंगळ, लघुग्रह, गुरू, शनी, युरेनस,नेपच्युन या ग्रहांचे विस्ताराने वर्णन केले आहे. या प्रत्येक प्रकरणाला दिलेला मथळा पण आकर्षक व अर्थपूर्ण आहे.

निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक ग्रहाबद्दल जे संशोधन केले आहे, त्याचा आढावा घेऊन लेखकाने त्या ग्रहाचे वातावरण, जडण, घडण, भूगोल, भूगर्भ इत्यादी गुणधर्माबद्दल नवीन व मौल्यवान माहिती या पुस्तकात समाविष्टकेली आहे.

या पुस्तकाचा विषय जरी शास्त्रीय असला तरी लेखकाच्या रसाळ शैलीमुळे सर्व निवेदन क्लिष्ट न वाटता मनोरंजक वाटते. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी संज्ञा फार कमी व आवश्यक जागीच वापरण्यात आल्या आहेत आणि मराठी शब्दांचा वापर जास्तीत जास्त केला गेला आहे. आजच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनात खगोलशास्त्र, अवकाशयानांमागील शास्त्र व तंत्र, रॉकेट तंत्र विद्या वगैरे विषयांबद्दल उत्कट जिज्ञासा आहे. त्यांच्या दृष्टीने डॉ. आपटे याचे हे पुस्तक फार उपयोगी व ज्ञानपुरक आहे. प्रत्येक पालकाने, शिक्षकाने व शालेय विद्यार्थ्याने जवळ बाळगावे, असे हे पुस्तक आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat