Sagaratil Navalai - सागरातील नवलाई
सागरातील नवलाई
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: R 80 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
सागराच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी....
सागर म्हणजे असंख्य चित्रविचित्र जीवांचा खजिना! नाना प्रकारचे, नाना जातींचे प्राणी, वनस्पती सागराच्या उदरात सुखासमाधानाने जगतात. अगदी आपल्या डोळ्यांना देखील दिसरणार नाही एवढ्या सूक्ष्म जीवांपासून तर देवमाशांसारखे प्रचंड देहयष्टीचे प्राणी सागरात अनादि काळापासून राहातात. त्यांची जगण्याची तर्‍हा देखील वैश्यिपूर्ण आणि मुलखावेगळी असते. त्यांचं वर्तन देखील विस्मयकारक असते. काही प्राणी चक्क सागराच्या लाटांवर आरुढ होऊन भटकत असतात तर काही मात्र सागर किनार्‍यावरील खडका दगडांमध्ये निवार्‍याला राहातात. काही जीव तर वाळू अथवा चिखलाच्या, गाळाच्या दलदलीत घर करून राहातात. कित्येक प्राणी दिवसभर कुणाच्याही नजरेला पडत नाहीत, पण रात्रीच त्यांचा संचार असतो. काहींचा संचार मात्र एकटा जीव सदाशिव प्रमाणे, तर काही प्राण्यांचा मोठा कळप असतो. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात देखील शत्रूला चकवा देण्यासाठी, स्वत:चा मार्ग सुकर करण्यासाठी चक्क आपल्या शरीरातून प्रकाशचे झोत सोडतात. जणू ते सागरातील तारेच म्हटले पाहिजेत. अत्यंत अप्रगत अवस्थेतील प्राणीदेखील समुद्रातील प्राण्यांच्या भाऊ गर्दीत, जीवन कलहात यशस्वीरित्या जगतात. आपली वंशीवेल वाढवितात. निसर्गाने मानवाला अनेकाविध अशा बहुरंगी, बहुढंगी जीवसृष्टीची देणगी मुक्तहस्ताने दिली आहे. हा निसर्गाचा अमोल असा ठेवा आहे. अथांग महासागरात हे चमत्कृतीजन्य प्राणी कसे राहात असतील? आपली वंशवृद्धी कशी करीत असतील? जीवनकलहात कसे टिकून राहात असतील? आपल्या सजातीय व विजातीय सहकार्‍यांशी त्यांचे वर्तन कसे राहात असेल? या सारखे अनेक प्रश्‍न जिज्ञासू व सुजाण व्यक्तिला पडल्याशिवाय राहात नाहीत. असंख्य चित्रविचित्र आणि अजब प्राण्यांची आपल्याला तोंडओळखही नसते. अशा या निसर्गाच्या अमोल ठेव्याचा सर्वांन परिचय व्हावा, या वन्यजीवांची ओळख व्हावी या उद्देशाने एका प्राणीशास्त्रच्या अभ्यासकाने-शिक्षकाने केलेला हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat