Hard Copy Price:
25% OFF R 170R 127
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मिराज म्हणजे मृगजळ. मैलोगणती पसरलेल्या रुक्ष वालुकामय प्रदेशात अतीप्रखर उन्हाचे वेळी, दूरवर दिसणारा पाण्याचा आभास. ज्याला खरं अस्तित्व नसतंय; पण असल्यासारखं वाटतं.
लेखक बंडूला चंद्ररत्न यांनी, वाळवंटी प्रदेशात घडणा-या या कादंबरीला फार समर्पक शीर्षक दिलेलं आहे. खेड्यातल्या शांत, संथ वातावरणातून उपजीविकेसाठी नव्याने विकसित झालेल्या शहरातल्या धबडग्यात येऊन राहणा-या दोन अश्राप जिवांची ही कथा. ते आणि त्यांची स्वप्नं यांची चित्तरकथा अंगावर शहारा आणते. सुख आणि स्वास्थ्य ही त्यांना शेवटपर्यंत मृगजळासारखी चकवत राहतात. पेट्रोडॉलर, उघड्यावर भरणारा सुवर्णबाजार यांच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आपण ज्या देशांविषयी ऐकतो, त्या तेल समृद्ध आखातील देशातलं हे दाहक आणि करूण वास्तव. अत्यंत साधेपणाने सरळ, समोर आलेल्या त्या चकचकीत नाण्याची ही दुसरी बाजू.
अक्षरश: जगातल्या सगळ्या देशातली माणसं जिथे पैसे कमवायला येतात, तिथल्या स्थानिक माणसांची काय गत होते याचं प्रभावी चित्रण यात वाचायला मिळतं. अशीच मोठी शहरं आपल्याही देशात आहेत. आसपासच्या खेड्यातून येणा-या स्थानिक कुटुंबांची अशीच परवड होत असेल का ? या विचाराने मला ही कादंबरी वाचत असताना झपाटलं आणि म्हणून मी ती अनुवाद करायला घेतली. वाचकांना काय वाटतं ते त्यांनी वाचून ठरवायचं आहे. श्री. सुनील मेहता व त्यांचे सहकारी कर्मचारी, श्री. चंद्रमोहन कुलकर्णी, यांचा मी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते.