Summary of the Book
कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांचे धार्मिक महत्त्व जसे आहे, तसेच या मंदिरांची स्थापत्यकला आणि शिल्पकलाही महत्त्वाची आहे. मंदिरांच्या शिखरापासून त्यांच्या उभारणीचा पाया कसा आहे, इथपासून मंदिर उभारणीचे शास्त्र मानवी शरीराशी कसे जुळले आहे, याची शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती देणारे पुस्तक म्हणजे "कोल्हापुरातील मंदिरसंपदा.'
पुस्तकात कोल्हापुरातील प्रसिद्ध मंदिरांच्या स्थापत्यकलेचा आणि शिल्पकलेच्या वारशांचा अभ्यास करून त्याचे महत्त्व वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न लेखक योगेश प्रभुदेसाई यांनी अत्यंत सोप्या भाषेत व सचित्र मांडला आहे.