Summary of the Book
एकनाथी भारुडांच्या व्यापक विश्वाची ही केवळ वानगी आहे. त्यांच्या सर्व भारुडांचा अभ्यास नाथकालीन समाजाचे अंतरंगदर्शन घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे... अशा गतिशीलतेपेक्षा स्थितिशील समाजव्यवस्थेत आढळणार्या व्यक्ती आणि त्यांच्या वृत्ति-प्रवृत्तींचे दर्शन एकनाथांच्या भारुडांतून घडते. भजन-कीर्तनांतून किंवा यात्रा-उत्सवप्रसंगी सादर होणार्या सोंगांतून लोकरंजन साधले जाई. भारूड हाही असाच एक लोकरंजनाचा, पण आध्यात्मिक उन्नती साधण्याचा बोध करणारा कलाप्रकार होता. एकनाथांच्यामुळे मराठी साहित्यात त्याला वैशिष्ट्यपूर्ण आणि चिरस्थायी स्थान प्राप्त झाले आहे.