Hard Copy Price:
25% OFF R 170R 128
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
नाथ हा माझा’ नंतर तब्बल 10 वर्षांनी आलेलं कांचन घाणेकरांचं हे पुस्तक. यात 16 कलावंतांची हृद्य व्यक्तीचित्रणं आहेत. कलामाध्यमातील व्यक्तींबद्दल जनमानसात एक कुतुहल असते. त्यांना संपूर्णपणे जाणून घेण्याची आकांक्षा असते. कलाक्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांची तुकड्यातुकड्याने घरगुती रूपे या पुस्तकातून वाचकांना भेटतात. लता मंगेशकर, ललिता पवार, ग. दि. माडगुळकर, भालजी पेंढारकर, सुलोचना, दुभाषी, घाणेकर ही सारी दिग्गज मंडळी आहेत. त्यांची घरगुती रूपे, त्यांच्या सवयी, भाषिक लकबी, माणंसातील नाती, व्यथा यांच्या गाठी या पुस्तकातून उलगडतात. प्रसिद्धीच्या झगमगाटी झोतात न आलेल्या काही व्यक्तीही येथे आहेत. त्यापैकी नृत्यकुशल, नव्याचे स्वागत करणारी, शिक्षणाच्या आभावावर मनाच्या औदार्याने मात करणारी लीला गांधी, नियमित व्यायाम करणारे विविध विषयांवरील साक्षात ज्ञानपीठ असणारे शाहु मोडक, यांची सुंदर शब्द चित्र आहेत. सहकलाकारांचं नातं किती निर्मळ असू शकतं याचं प्रत्यंत्तर देणारी चंद्रकांत-सुलोचना यांच्या नात्याची प्रसन्न उदाहरणं आहेत. फडके-माडगूळकर-राजा परांजपे या त्रयीने चित्रपटाला मोठेच योगदान दिले. परंतु मद्य, पत्ते, वाचनाचा अभाव, मतभेद यामुळे त्यांच्या हातून बरेच काही निसटले. स्वामीकार रणजित देसाई त्यांचा मोठेपणा आणि एकटेपणा, खानदानी अदब आणि तुटलेपणा याचे मार्मिक वर्णन यात आहे. माई मंगेशकर व मधू आपटे या काहीशा दुर्लक्षित व्यक्तीही इथे भेटतात. या सर्व चित्रणातून कांचन घाणेकराचं उत्कट माणसांच्या प्रेमाची आसक्ती असलेलं, नातेसंबंध प्रयत्नपूर्वक पण समंजसपणे स्विकारणारं व्यक्तित्त्व प्रकट होतं.