Summary of the Book
बहुपेडी प्रतिभचे गुलजार यांच्या कविता देशोदेशी वाचल्या जातात. 'सारे संगें हा त्यांचा मराठीत अनुवाद झालेला कवितासंग्रह आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनात स्थान असणाऱ्या व्यक्तींवर त्यांनी कविता केल्या आहेत. या कविताही नेहमीपेक्षा वेगळ्या आहेत. एखाद्या माणूस त्यांना जसा जाणवला, त्या पद्धतीने त्यांनी तो कवितेतून मांडला आहे. 'सेल्फ पोट्रेट'या कवितेतून ८५ वर्षात घडलेले स्वतःचे व्यक्तिमत्त्व गुलजार यांनी व्यक्त केले आहे. कवी ग्रेस, वि. वा. शिरवाडकर, नामदेव ढसाळ या मराठीतील नामवंतांवरील कविताही यात आहेत. बिरजू महाराज यांचे वर्णन गुलजार 'काळाच्या उदरातून निघालेल चक्रीवादळ' असे करतात ; तर नसरुद्दीन शहा ' एक अदाकार असल्याचे लिहितात. अशा भोसले यांना उद्देशून ते 'रोप हे स्वरांचे आहे !, असे म्हणतात. जीबनानन्द दास, मुन्शी प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, अमृता इमरोज, शेक्सपियर, व्हॅन गॉग, अमजद खान, संजीवकुमार, राजीव गांधी, निल आर्मस्ट्रॉंग आदी देशोदेशीची व्यक्तिमत्त्वे गुलजार यांच्या कवितांमध्ये सामावली आहे. याचा मराठी अनुवाद किशोर मेढे यांनी केला आहे.