ज्योतिष व उपासना अशा परंपरागत विषयांची कालानुरूप मांडणी हे ‘ग्रहसंकेत’चे वैशिष्ट्य आहे. दरमहाच्या अंकात ते दिसून येतेच; दिवाळी अंकातही ते ठळकपणाने जाणवते. सविस्तर तरीही अतिशय नेमकेपणाने आगामी वर्षाचे राशीनुसार भविष्य या अंकात दिले आहे. त्यामुळे आगामी वर्षाचा संपूर्ण आलेखच डोळ्यासमोर उभा राहतो. आपली वाटचाल कशी असायला हवी याचे मार्गदर्शन त्यातून होते.
उपासना दशमहाविद्यांची हा अतिशय मनोज्ञ लेख पुन:पुन्हा वाचावा असा आहे. देवीच्या दहा रूपांचे रूपक समर्पक शब्दात सहजपणे या लेखात उलगडले आहे. वाचकांना नवी दृष्टी देणारा असाच आणखी एक लेख म्हणजे डॉ. चंद्रशेखर देसाई यांनी लिहिलेला ‘अनुभवाविण मान डोलवू नको.’ वर्तमानात जगण्याची कला साधायची असेल तर वाचायलाच हवा असा हा लेख आहे. षट्चक्र, साधना हे विषय आपले नाहीत, असे वाटणार्यांनाही उपयोगी ठरेल असे दोन लेख या अंकात आहेत. ‘कुंडलिनी आणि षट्चक्रे’ हा डॉ. विश्वास मंडलिक यांचा लेख आधुनिक विज्ञानानुसार बौद्धिक विकासात चक्रसाधनेचे मह्त्त्व अधोरेखित करतो. आरोग्यप्राप्तीसाठीही चक्रांचा उपयोग सर्वांनाच कसा करून घेता येईल याचा वेध या लेखात घेतला आहे. सप्तचक्र आणि साधना या दुसर्या लेख