Summary of the Book
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारल्यावर मोहन रानडे यांनी या मासिकात लिहिलेल्या सदराचे हे पुस्तक आहे. प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. दोन टप्प्यात मोहन रानडे यांनी या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळली. या दोन वेळच्या कारकिर्दीत त्यांनी विविध विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.
व्यक्तिचित्रण, लघुनिबंध, आंतरराष्ट्रीय राजकारण, स्थानिक घडामोडी अशा सर्व विषयांवर रानडे यांनी लेखन केले आहे. नव्या गोष्टीबद्दल औत्सुक्य, मत व्यक्त करतानाचा स्पष्टपणा, त्याचबरोबर लेखनात डोकावणारी मिश्किलता याबरोबरच एखाद्या मुद्दयाच्या तळाशी जाणारा चिकित्सकपणाही या लेखांमधून दिसून येतो.