Summary of the Book
सायमन मार्टिन यांच्या कवितेच्या जाणिवेची जडणघडण ही पुरोगामी विचार, तत्त्वज्ञान, सामाजिक उत्थानाचे लढे, मूल्यव्यवस्था या सर्व घडामोडीतून आकारास आलेली आहे. त्यामुळे ती वाचकाला परिवर्तनाची वाट दाखवणारी, सामाजिक संघर्षात समताधिष्ठीत मूल्यांचा आग्रह धरणारी अशी आहे. तसंच समाजाच्या व्यथावेदनांचं सजग भान देणारी आहे. ख्रिस्तांच पुनरुत्थान म्हणजे अंधकाराच्या राज्यावर मिळवलेला मोठा विजय आहे. त्या विजयामुळे सैतानी शक्तीचा कायम नि:पात करण्याचं बळ मिळतं. ख्रिस्ताच्या या आगळ्यावेगळ्या शक्तीमुळे सामान्यांना विजयी जीवन जगण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं.