Summary of the Book
लेखिका प्रतिभा सराफ यांचा ‘सलग पाच दिवस’ हा कथा संग्रह म्हणजे आशयसंपन्न, अनुभवसंपन्न आणि वास्तवावर आधारलेल्या दर्जेदार कथांचा संग्रह आहे. माणसाच्या आयुष्यात विविध अनुभव, अनेक वळणं, सुख-दुःखाचे चढ-उतार, ऊन-सावलीचे प्रसंग येतात. लेखिकेने या कथांमधून समरसून एकरूपता साधली आहे. हे प्रसंग आपल्या थेट डोळ्यासमोर उभे राहतात. ही पात्रे आपल्याच अवती-भवती असल्याचा अनुभव येतो.