Summary of the Book
'दृश्यकला आणि साहित्य' हे वसंत आबाजी डहाके यांचे पुस्तक कलामीमांसा करणारे मराठीतील महत्त्वाचे लेखन आहे. सुधीर पटवर्धन यांची चित्रकला, संदेश भंडारे यांची छायाचित्रकला, नितीन दादरावाला यांच्या ग्रंथातील छायाचित्रकारांच्या कार्याचा मागोवा, सुधारक ओलवे यांचा छायाचित्रात्मक वैचारिक निबंध, व्हिन्सेंट व्हान गॉग याची चित्रकला, रेनी मॅग्रिट या बेल्जियन अतिवास्तववादी चित्रकाराची चित्रे अशा वेगवेगळ्या कलावंतांच्या कलानिर्मितीची चिकित्सा करणारे लेख या पुस्तकात आहेत. त्याचबरोबर साहित्य आणि चित्रपट, कला, नाटक व पटकथा, कविता आणि चित्रकला, छायाचित्रकला, कादंबऱ्यांची निर्मिती, रहस्यकथेचा रूपबंध आणि साहित्य या कलेसंबंधीचे चिंतन असे वरवर पाहाता वेगवेगळ्या विषयांवरचे लेख या पुस्तकात एकत्रित केले आहेत.