Summary of the Book
गणेशगीतेचा मुख्य विषय 'योगशास्त्र' हा आहे. त्यात योग म्हणजे काय आणि योग म्हणजे काय नाही, हे प्रारंभी स्पष्ट केले आहे. नंतर योगाचे प्रकार, आचरण, परिणाम, फलीत असा सर्वांगीण विचार केला आहे. गणेशगीतेत गणेशाने योग मार्गाचा अवलंब करुन मोक्ष प्राप्त कसा करता येईल, हे सांगितले आहे.
योगात असलेली ताकद, सामर्थ्य माणसाला अंतिम ध्येय मिळवून देते, असे लेखिका सुनंदा देशमुख यांनी म्हटले आहे. गणेशगीता द्वापारयुगातील आहे, असे सांगून या गीतेचा अभ्यास तुलनेने सुलभ असल्याचेही त्या सांगतात. गणेशगीतेचे अध्याय दिले आहेत. त्यानंतर या गीतेचा अन्वयार्थ स्पष्ट केला आहे. गणेशगीता आणि भगवद्गीता यांची साम्यस्थळे उलगडली आहेत.