Summary of the Book
'तुम्ही पीएचचं रक्षण केलंत तर पीएच तुमचं रक्षण करेल,' असं या पुस्तकाचं घोषवाक्य आहे. हा पीएच म्हणजे काय, तर पॉवर ऑफ हायड्रोजन. माधव जोशी यांनी या शक्तीचं संतुलन कसं राखायचं याचं मार्गदर्शन केलं आहे. आपल्या रक्ताचा पीएच ७.४ असावा लागतो. आपल्या शरीरात
चालू असलेल्या चयापचय वा श्वसन क्रियेमुळे रक्ताचा पीएच प्रभावित होत असतो.
त्यांचं असंतुलन होउ नये म्हणून काय करायचे आणि झालेच तर काय करायचे याचं मार्गदर्शन ते करतात. त्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाची गरज असते. आहार तक्त्याबरोबरच त्यांनी रोज धन्वंतरी योग करण्याचा सल्ला दिला आहे. मसलमास कसं वाढवायचं याचं मार्गदर्शनही केलं आहे..