Summary of the Book
बायपास, अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियांशिवाय हृदयविकाराचे निवारण कसे करायचे, याचे मार्गदर्शन भालचंद्र गोखले यांनी या छोटेखानी पुस्तकातून केले आहे.
.
त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम, हृदयाचे कार्य, हृदयविकाराचे प्रकार आदी माहिती दिली आहे. त्यानंतर हृदयविकारावर मात करण्यासाठी ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे शरीराला पोहोचणाऱ्या हानीची माहिती दिली आहे.
त्यामुळे अशा शस्त्रक्रियाऐवजी किलेशन थेरपी, ओझोन थेरपी, चालण्याचा व्यायाम, योगसाधना, आहारावर नियंत्रण आदींचे साह्य घेऊन हृदय विकारावर मात कशी करायची याविषयी माहिती दिली आहे;
मात्र याचा अवलंब करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही सांगायला ते विसरत नाहीत.