Hard Copy Price:
25% OFF R 80R 60
/
$
0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
खलिल जिब्रानच्या 'द फोअर रनर (अग्रदूत)' या पुस्तकातल्या अठरा रूपक-कथांच्या श्री. वि. स. खांडेकरांनी केलेल्या अनुवादांचा हा क्रमाने दुसरा संग्रह आहे. 'सुवर्णकण' हा जिब्रानच्या अनुवादित रूपककथांचा या आधीचा संग्रह.
जिब्रानमध्ये कवी, टीकाकार व तत्त्वज्ञ या तिघांचं मिश्रण झालं आहे. या त्रिवेणी संगमामुळं त्याच्या कथांची रम्यता वाढली आहे; पण त्या रम्यतेबरोबर गूढतेनंही तिथं प्रवेश केला आहे. सामान्य वाचकाला मूळ कथेचं मर्म अधिक स्पष्ट व्हावं, तिचा रसास्वाद अधिक सुलभतेनं घेता यावा, बाह्यत: जी त्याला काळोखानं भरलेली गुहा भासन असेल, तिथं उज्ज्वल प्रकाशानं नटलेलं सुंदर भूमिगत मंदिर आहे, याची जाणीव त्याला व्हावी, या हेतूनंच जिब्रानच्या अत्यंत अर्थपूर्ण आणि गूढरम्य कथांखाली सुंदर विवेचन करण्याची प्रथा श्री. खांडेकरांनी सुरू केली. या छोट्या छोट्या कथा वाचताना, जीवनातल्या सर्व विसंगती पूर्णपणे ठाऊक असूनही, त्याच्यावर उत्कट प्रेम करणार्या, आपल्या कल्पकतापूर्ण उपरोधानं, ढोंग, जुलूम, असत्य, अन्याय यांचं हिडीस स्वरूप स्पष्ट करून दाखवणार्या आणि जगातलं मांगल्य वृद्धिगंत व्हावं, म्हणून तळमळणार्या आत्म्याचं दर्शन वाचकांना घडेल; आणि त्या आत्म्याच्या सान्निध्यात, घटकाभर का होईना, ते अधिक उन्नत, अधिक मंगल आणि अधिक विशाल अशा जगात वावरू लागतील, अशी खात्री वाटते.