Summary of the Book
'निवडक बँकिंग निवाडे' या पुस्तकाचे शिर्षकच पुस्तकामध्ये कुठला विषय हाताळला गेला असेल याबाबत कल्पना येण्याकरिता पुरेसे बोलके आहेत. आजच्या परिस्थितीत जवळ जवळ प्रत्येकाला मग तो शेतकरी, व्यापारी अथवा नोकरदार वर्गांपैकी कुोणीही असो, त्याला वित्त साह्याकरिता बँकांकडे जाणे अपरिहार्य असते. अशा परिस्थीतीत बँकाचे कर्जाचे व्यवहार कशा प्रकारे चालतात, साधारणपणे कशाप्रकारचे करारनामे असतात या विषयीचे ज्ञान असणे आवश्यक असते. अशा प्रकारचे ज्ञान साधारणपणे निरनिराळ्या खटल्याचे निकाल वाचून मिळविता येऊ शकते. परंतु सर्वसाधारण व्यक्तिला अशा प्रकारे निकाल वाचून काढणे शक्य नसते. बर्याच वेळी निकाल पत्रांमधील कायद्याची क्लिष्ट भाषा समजण्यास कठिण होते. प्रस्तुत पुस्तकातील निरनिराळ्या २२६ बँकिंग निवाड्यांचे मराठी भाषेतील अनुवादीत संकलन हे सर्वसामान्य व्यक्तिकरिता मार्गदर्शक ठरेल, या विषयी शंका नाही. तसेच प्रत्येक निकाल हा कुठल्या न्यायालयाद्वारे देण्यात आला व तो कुठल्या पुस्तकात प्रसिद्ध झाला या विषयीची माहिती प्रत्येक निकालाच्या शेवटी दिल्यामुळे सदर पुस्तक हे वकिलांना देखील साह्यभूत ठरेल, या विषयी खात्री आहे.