Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
बाबासाहेबांबद्धल किशोरांना त्यांच्या जीवनातील ठरावीक घटना सोडता विशेष काही माहित नसते, मग त्यांचे महत्व समजणे तर दुरच. तरुणपणीही ते समजतेच असे नाही कारण तोवर अनेकांचे पुर्वग्रह तयार झालेले असतात. बाबासाहेबांचे विश्व व्यामिश्र आहे आणि म्हणूनच ते फार प्रेरक आहे हे समजेपर्यंत उशीर होऊन जातो. बाबासाहेब सर्वांचे हे अनेकदा लक्षातही येत नाही. व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीच्या काळातच बाबासाहेब "मिस" होत जातात. नंतर समजते तेंव्हा उशीर झालेला असतो. बाबासाहेब महामानव आहेत पण आपणही योग्य वयात प्रयत्न केला असता तर काही शिड्या जास्त लवकर चढू शकलो असतो हे लक्षातच येत नाही.
यामुळे श्री. रवींद्र गोळे यांनी या महामानवाचे विराट दर्शन योग्य वयातच किशोरांना ( आणि बाबासाहेबांपासून दुर राहिलेल्या प्रौढांनाही) व्हावे यासाठी अत्यंत सोप्या भाषेत महामानवाचे दर्शन या पुस्तिकेतुन दिले आहे. बाबासाहेब सांगण्याचे प्रयत्न आज वर्तमानात अनेक महनीय करतच आहेत. श्री. गोळेंनी या पुस्तकाच्या रुपातून बाबासाहेबांचे महानत्व या पुस्तकातून सारांश रुपाने पण समग्रपणे या पुस्तकातून मांडले आहे. आपल्या पाल्यांना हे पुस्तक अवश्य द्यावे!
स्वत:ही वाचावे!