Summary of the Book
"लिव्हिंग विथ डायबेटिस" हे आत्मपर लेखन निकोलने केले आहे. ते अतिशय प्रांजल, प्रामाणिक आहे. मिस अमेरिका म्हणून मिळालेला पैसा ती बालमधुमेहींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत देण्यासाठी करीत होती. त्याचबरोबर लिव्हिंग विथ डायबेटिस हे आवाहन कसे पेलावे, त्यासाठी जीवनशैली कशी ठेवावी, व्यायाम कसा आणि केव्हा करावा, आहाराचे नियम या बाह्य गोष्टींसह सकारात्मक दृष्टिकोन आणि दैवी शक्तीवरती अपरंपार विश्वास या अंतर्मनाच्या शक्तींचा कसा वापर करावा, हे निकोलने अतिशय मन:पूर्वक सांगितले आहे.