Summary of the Book
'जळते रहस्य' हा स्टिफेन झ्वायगच्या 'बर्निंग सिक्रेट्स'चा अनुवाद. पण, अनुवाद करण्यामागची भूमिका बोरकर तळमळीने विशद करतात. झ्वायगसारखा मोठा साहित्यिक मराठीत येण्याची गरज सांगतानाच, अनुवादाच्या मनोरंजक पण गुंतागुंतीच्या कामाविषयीही नेमकेपणाचं भाष्य आढळतं.