Summary of the Book
दर्जेदार दिवाळी अंकाची यादी काही दिवाळी अंकांच्या समावेशाशिवाय पूर्णच होत नाही. त्यातील एक नाव म्हणजे धर्मभास्कर. ४१व्या वर्षांत पदार्पण करणारा धर्मभास्करचा यंदाचा अंकही वैचारिक चालना देणारा व संस्कारक्षम आहे. त्यातही ज. द. जोगळेकर यांची युद्धकथा, बाळ राणेंची स्त्रीभ्रूण हत्येविरोधातील कथा रोचक आहेत. शंकर वासुदेव अभ्यंकर यांचा बंकिमचंद्र चटर्जी यांच्यावरील दीर्घलेख अभ्यासपूर्ण आहे. आधुनिक राजकारणाचे तीन नायक हा करंबेळकर यांचा लेख प्रेरणादायी आहे. दर्शन हा गिरीश दाबके यांचा गीतेवरील चिंतनाचा लेख, अशोक मोडक यांचा हिंदुत्वावरील लेख हे धर्मभास्करच्या परंपरेला साजेशे आहेत. भ्रष्टाचारासारखी अपप्रवृत्ती सुरू राहण्यात कायद्याचे योगदान किती, हा वेगळ्या धाटणीचा लेख माहितीपूर्ण आहे. अमेरिकेतील अध्यात्म व आतंकवाद हा दादुमिया यांचा लेख विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. अमेरिकेतील सद्यस्थितीचे व त्यांतून त्यांना झालेला साक्षात्कार याचे समर्पक दर्शन होते.