Summary of the Book
अमेरिकेतील 'सॉलोमन नॉरथप' या काळ्या माणसाने त्याची ही कथा १८५३ साली जगाला सांगितली आणि वाचकांच्या अंगावर ती कहाणी वाचून अंगावर काटा आला. हा माणूस न्यूयॉर्कमध्ये स्वतंत्र नागरिक म्हणून त्याचे आयुष्य शांतपणे जगत होता. त्याला फसवून वॉशिंग्टन येथे नेण्यात आले आणि त्याला पळवून दक्षिण अमेरिकेत नेण्यात आले व एक सामान्य गुलाम म्हणून विकण्यात आले. लुझियाना राज्यात त्याने १२ वर्षे गुलामीत हलाखीचे जिणे जगत काढले. नंतर त्याने तेथून कशी सुटका करून घेतली हे वाचण्यासारखे आहे. त्याच्या या कहाणीत गुलामांचा व्यापार कसा चालत होता यावर चांगला प्रकाश पडतो. शिवाय गुलामांना कशी वागणूक मिळत होती याची अंगावर काटा आणणारी ही कहाणी...