Summary of the Book
लोक जे बोलतात, हे त्यांच्या मनातील विचार किंवा त्यांना काय वाटतं यापेक्षा वेगळं असतं असं त्यांच्या देहबोलीतून लक्षात येतं. आता, या अधिकारयुक्त आणि मनोरंजक अशा मार्गदर्शक पुस्तकामुळ तुम्हाला देहबोलीविषयीची काही गुपितं शिकता येणार आहेत. त्यामुळं तुम्हाला व्यवसायविषयक व्यवहारापासून ते योग्य जोडीदार निवडायच्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याचा आत्मविश्वास आणि प्रसंगावर नियंत्रण ठेवण्याची ताकद मिळणार आहे. चला तर मग, शारीरिक हालचालींचा अर्थ जाणून घेण्याची, मनात दडलेले, लपलेले विचार आणि भावना ओळखण्याची तंत्र शोधू या आणि योग्य निर्णयाप्रत पोहोचू या.
- इतरांवर सकारात्मक छाप कशी पाडाल.
- यशस्वीपणे मुलाखत कशी द्याल आणि वाताघाटी कशा कराल.
- दुस-यांशी चटकन नातं कस जोडाल आणि इतरांकडून सहकार्य कसं मिळवाल.
- इतरांना तुम्ही कसे आवडाल आणि ते तुमाचाकडे कसे येतील.
- एखादा खोटे बोलत आहे हे कसे सांगाल.
- जे म्हटलं आहे त्यातला गर्भितार्थ कसा ओळखाल.
- तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी देहबोलीचा वापर कसा कराल.
- प्रेमाचे संकेत आणि सत्तेचे खेळ कसे ओळखाल.