डायरी ऑफ अॅन फ्रँक
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 220 R 165 / $ 3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
ऍन फ्रँक ही एक तेरा वर्षाची ज्यू बालिका. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे घाबरून तिच्या कुटुंबातली चार व आणखी चार माणसे मिळून ऍम्स्टरडॅम येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर जवळजवळ दीड दोन वर्षे लपून रहातात. या अवधीत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरीही आज ना उद्या आपली सुटका होईल या आशेवर ती जगत राहतात.


ऍनला तिच्या तेराव्या वाढदिवशी तिचे वडील एक रोजनिशी बक्षीस देतात. त्या दिवसापासून ती रोजनिशी लिहायला सुरवात करते, ती त्या सर्व मंडळींना पकडून छळगृहात नेईपर्यंत. तिथे अतिशय हालअपेष्टा सोसताना त्या आठांपैकी सात जणंना मृत्यू गाठतो. फक्त ऍनचे वडील ऑटो फ्रँक जगून वाचून सुटून परत येतात. त्यांना ऍनची रोजनिशी सापडते. तिचे संकलन करून ती ते छापतात. त्यात व्यक्तींची नावे काल्पनिक होती. परंतु युद्धसमाप्तीला अर्धशतक लोटल्यानंतर परत संपूर्ण रोजनिशी काही काटछाट न करता छापलेली आहे.

1995 साली हे लोक ज्या ठिकाणी अज्ञातवासात राहिले होते ती इमारत आता विकत घेऊन तिथे ऍन फ्रँकचे स्मारक केले आहे. ऍन वापरत असलेल्या काही वस्तू, तिचे हस्ताक्षर तिथे ठेवलेले आहे.

तिच्या रोजनिशीची आजपर्यंत जगातल्या जवळजवळ सत्तर (70) भाषेत भाषांतरे झाली आहेत. ती सर्व, त्या ऍम्स्टरडॅममधल्या तिच्या स्मारकाच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवली आहेत.
Book Review
Write a review

Sahil Rajendra Kharat
22/07/2020

पुस्तक खूपच छान आहे. हे पुस्तक लेखिकेने फक्त तिची रोजनिशी म्हणून लिहिले होते. व तिला हे ही वाटले होते की एका १३ वर्षाच्या मुलीची रोजनिशी वाचायला कुनाला आवडेल ? पण ते पुस्तक (तिची डायरी) आज जगात सर्वात जास्त वाचले जाणारे पुस्तक आहे. तिला लेखिका व जर्नलिस्ट व्हायचे होते. तिची खूप स्वप्ने होती. जिवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होता. पण त्या छळछावणीतच तिचा अतिशय दुर्दैवी अंत होतो. सर्व स्वप्ने तूटतात. तिला तिच्या प्रिय किटीपासुन, तिच्या वडिलांपासून,तिच्या आईपासून दुर व्हावे लागते. तिची बहिण तर तिच्या डोळ्यांसमोर मरते. तीचा पण २ आठवड्यात मृत्यू होतो. वाचतात फक्त तिचे वडील ओटो फ्र्याण्क. ज्या घरातुन त्यांना छळछावणीकडे नेल्याले असते.त्या घरात त्यांना तिची डायरी सापडते. ते ती डायरी प्रकाशित करतात. वा ती सर्वात जास्त वाचले गेलेल्या पुस्तकांपैकी एक होते. ती जीवंत असती तर किती मोठी लेखिका असती. असे वाटते की ती मरायच्या अगोदर तरी तिला माहित असायला पाहिजे होते की ती भविष्यात इतकी प्रसिद्ध होणार आहे. तिच्या आत्म्याला शांती लागो हिच अंतीम प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏
vishal
30/11/2016

चांगलं पुस्तक आहे . लेखिकेची अखेर छळछावणीत होते हे वाचून दुक्ख होतं ..
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat