उजळेन तरीही
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 120 R 90 / $ 1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
उजळेन तरीही हे शीर्षक कवयित्री मृणाल घाटे यांच्या कवितेतील आशावादाच्या प्राणतत्त्वाचे दर्शन घडवते.
जळणे याच्याशी उजळणेचा असलेला घट्ट अनुबंध लक्षात घेता सभोवतालच्या चटक्यांनी पेटून उठणे अन् राख न होऊ देता उजळून निघणे हा अंत:करणातला स्थायी भाव मृणाल आपल्या कवितेतून मृदू, हळुवारपणे रेखाटतात.
मृणाल घाटे यांना सुरांची साथ संगत आहे, त्यामुळेच या संग्रहातील कवितांना एक अंतर्गतच लय आहे. श्वासांना, शब्दांना, जगण्याला लय सापडली की कसलेच भय उरत नाही अन् आशावादाचा जन्म होतो. पानोपानी जीवनगाण्याची मैफिल समजावणारा हा संग्रह आहे.
वाऱ्यावर येता तुझिया
सांगावा आगमनाचा
सळसळला विणेमधुनी
मल्हार राग देहीचा
क्षितिजाला सावळ बाधा
कवडशात रंगीत पाणी
मनमोर सुखावून गातो
ओल्या पंखांची गाणी
या ओळी प्रतिक प्रतिमांना लेवून निसर्ग व स्त्रीसुलभ भावनाचा कॅनव्हास रंगवत जातात.
मृणाल घाटे यांची अनुभवाभिव्यक्ती ही विलक्षण लक्षवेधी आहे. सोज्वळ, सात्विकतेचे ध्यासपर्व श्वासात रुजवून कवयित्री जीवनाची सम शोधत आहे हे मात्र नक्की, तरीही या शब्दातला भावगर्भ सोसण्याला मागे टाकत जातो याची सिद्धता अधोरेखित करणारा हा काव्यसंग्रह उजळ माथ्याने साहित्य प्रांतात मुसाफिर करतच काव्यरसिकांच्या मनात घर करेल या माझ्या विश्वासासह मृणाल घाटे यांच्या पुढील काव्यप्रवसास मन:पूर्वक शुभेच्छा.
Book Review
Write a review

Vijay Bongirwar
30/06/2019

वाचन सुरू केले अनं वाचतच गेलो. कवियत्रीच्या कल्पनांमध्ये रमत गेलो. जीवनाविषयीचा सकारात्मक पदोपदी जाणवतो. एक करूण झालर ही कवितेत समाविष्ट होते."शुभंकरोती संध्याकाळी कोप-यात एका विझून जाईल,कविता करायची राहून जाईल". एक सुंदर काव्यसंग्रह.
Varsha Bhat
28/06/2019

खुप सुंदर भावतरल कवितांचा खजिना.कित्ती दिवसांपासून मी अशा प्रगल्भ आशयसंपन्न कवितांच्या प्रतिक्षेत होते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat