Summary of the Book
प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे `पत्रकारिता’ हा प्रचंड आकर्षण असलेला एक व्यवसाय बनला आहे. पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारितेत प्रवेश करण्यासाठी तसेच या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणते ज्ञान व कौशल्य आवश्यक आहेत, पत्रकारांची विविध कामे व जबाबदार्या कोणत्या, कोणकोणत्या क्षेत्रात पत्रकारिता करता येते हे आजच्या पिढीला सुलभतेने समजावे म्हणून `पत्रकारिता-विद्या’ हा ग्रंथ तयार केला आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीतील अनेक ज्येष्ठ व नामवंत पत्रकारांनी तसेच काही युवा पत्रकारांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रासंबधी या ग्रंथात सैद्धान्तिक, सखोल व अनुभवसंपन्न मार्गदर्शन केले आहे. पत्रकारितेत प्रवेश करून इच्छिणार्या युवकांना, पत्रकारिता विषयातील पदवी किंवा पदविका यांचे विद्यार्थी व अध्यापक तसेच या क्षेत्रात नव्यानेच पदार्पण करणार्या पत्रकारांना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.
`पत्रकारिता-विद्या’ हा ग्रंथ म्हणजे पत्रकारिता या व्यापक व विविधांगी विषयासंबंधीचे मूलभूत आणि अत्यावश्यक ज्ञान एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याचा मराठीतील पहिलाच प्रयत्न आहे.