लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचला. आता हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या दैवताला जाणुन घेण्यासाठी डॉ. सी. ग. देसाई यांनी 'सुखकर्ता दु:खहर्ता' मधुन गणेशोपासकांना उपास्य दैवताची सर्व माहिती पुरविली आहे. श्रीगणपती गजाननाचा वेदकाळापासूनचा उगम व विकास, गणपतीची स्तुती व उपासना सांगणारी उपनिषदे, श्रीब्रह्मणस्पतिसूक्तमची माहिती व सूक्त, श्रीगणपतीमालामंत्र, त्याचे मराठी स्तोत्र, गणेश उपनिषदे व गणपती यांचा परिचय यातून दिला आहे. गणपती अर्थवशीर्ष, त्यातील विविध पाठभेद, शांतीपाठ, अर्थवशीर्षाचा गेयानुवाद, त्याचे विवेचन, गणेश यंत्रांची माहिती व गजाननाच्या कथाही सांगितल्या आहेत. श्रीमुदगलपुराणाचा परिचय, गणेशमूर्ती व चतुर्थीच्या निर्मितीचे रहस्य, गजमुखसंबंधी विविध उपपती, उपासनेची साधने, कथा व महत्त्व, मराठी संत व कवींची गणेशस्तवनातील काही वेचे देत गणपती व गणेशपूजेविषयी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात मार्गदर्शने केले आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक, परदेशातील गणेश स्थाने, गणेशभक्त यांविषयीची माहितीही दिली आहे.
'सुखकर्ता दुःखहर्ता' या पुस्तकाचा 'बाइट्स ऑफ इंडिया'वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4689169975094900161