Summary of the Book
बावन्न साली ‘संपादकाचे जीवनस्वप्न’ प्रसिद्ध झाले. गेल्या पन्नास वर्षांत पत्रकारितेचे जग ढवळून निघाले तरी संपादकाची बांधीलकी, वाचकांचा वृत्तपत्रांत गुंतलेला जीव आणि बातमीदारांतले ताणेबाणे हा आजही तितकाच चर्चेचा विषय आहे, म्हणून हे ‘संपादकाचे जीवनस्वप्न’, जितके नॉस्तॅल्जिया जागवणारे आहे, तितकेच समकालीनही आहे. आजच्या काळाशी जोडण्यासाठी त्यात पत्रकार कुमार केतकर यांचा ताजा लेख समाविष्ट केला आहे.