Summary of the Book
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. अनेक आव्हानांना भारतीय संस्कृतीने झेलले. तरीही आज हजारो वर्षानंतरही ही संस्कृती टिकून राहिली याला कारण म्हणजे मानवी जीवनप्रणालीचे संस्कार यात आहेत.
पायाभूत चार आश्रम, १६ संस्कार, पंचयज्ञ, धर्मश्राद्ध आदींचे संदर्भ आजच्या काळातही लागू पडतात. भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया काय आहे. त्याचे सार, धर्माचे खरी व्याख्या, पंथ, वर्णव्यवस्था, भारतीय आयुर्वेद, दैनंदिन उत्सव, सण, अष्टांगयोग याची माहिती अॅड. शंकर निकम यांनी 'संस्कार - वेध ' यात दिली आहे.
गीता, मनुस्मृती यातील श्लोकांचे अर्थ, त्याचा विपर्यास, धर्माचे खरे स्वरूप. वेदांमधील स्त्रीविषयीचे विचार, त्यातून निर्माण झालेल्या चुकीच्या प्रथा, समाज व्यवस्था नीट चालावी म्हणून प्राचीन काळी जन्माला आलेली वर्ण व्यवस्था, जन्मानुसार वर्ण ठरू लागण्यावर देशाची झालेली अवनती, भारतीय शिक्षणपद्धती,
भारतीय संस्कार, गर्भाधान, बाल संस्कार, त्यांचे अध्ययन, त्यासाठी सरकारची तरतूद, सवलती, विवाह, अंत्येष्टी, श्राद्ध, अग्नीचे महत्त्व, विविध स्तोत्रे, स्पंदन शास्त्रानुसार मुलामुलींचे नावे विविध उपयुक्त माहिती यातून मिळते. भारतीय संस्कृतीची ओळख यातून होतेच शिवाय वेगवेगळ्या देशांच्या दृष्टीकोनातून या संस्कृती महत्त्व समजते.