Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
कोणत्याही क्षेत्रात मुलभूत माहिती ही प्रगतीचा प्राण असते. त्यामुळे अन्य क्षेत्राप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातही संबंधित सर्व कार्यकर्त्यांना उपयुक्त माहिती सहज व सुलभतेने उपलब्ध व्हावी. त्यातून त्यांच्या संस्थेची प्रगती व्हावी, या साठी सार्वजनिक ग्रंथालय मार्गदर्शक हे पुस्तक नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकांच्या वापरामुळे ज्या कार्यकर्त्यांना/संस्थांना ग्रंथालय सुरू करायचे आहे, त्यांनाही मार्गदर्शन व्हावे. तसेच जी ग्रंथालये सुरू आहेत त्यांना शासकीय मान्यता, अनुदान, वर्गबदल या दृष्टीनेही मार्गदर्शन व्हावे, या दोन्ही दृष्टीने या पुस्तकांचे संकलनस संपादन केले आहे. या ११२ पानी पुस्तकात सर्व माहिती विषयवार संग्रहित आहे. सार्वजनिक कार्यकर्त्यांची शक्ती, व वेळ वाचावा, सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती अधिक चांगली व्हावी.
परिणामी त्या त्या भागात लहानमोठ्या सर्व प्रकारच्या वाचकांच्या पुस्तकांची गरज प्रभावीरीत्या व अधिक चांगली पूर्ण व्हावी, ही अपेक्षा व आशा या उपक्रमामागे आहे. हे पुस्तक सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांना/पदाधिकार्यांना संपूर्ण मार्गदर्शन करणारे आहे. सार्वजनिक ग्रंथालयांसाठी आणि ग्रंथालय विभागासाठी अशा दोन विभागातून या पुस्तकात माहिती संग्रहित करण्यात आली आहे. ग्रंथालय सुरू करायचे असेल किंवा विद्यमान ग्रंथालयांना वर्गबदल करायचा असेल, विशिष्ट अनुदान मिळवायचे असेल, या सर्व विषयांवर यात अद्ययावत माहिती व मार्गदर्शन आहे. ग्रंथालयांना लाभणारे विविध प्रकारचे फॉर्मेटस् तक्ते, शासनाला पाठवायच्या माहितीचे तक्ते आदि सर्वांचे नमुनेही यात दिले आहेत. सर्व प्रकारची माहिती सहज हाताशी असल्यामुळे सार्वजनिक ग्रंथालयांचे काम खूप सोपे व सहज झाले आहे.