Summary of the Book
स्त्रीने आपल्या देवदत्त, देवदत्त सर्वस्वाचं अर्ध्य जीवनाला दिलं तर पुढची पिढी आणि क्रमशः समाज समृद्ध होतो. स्त्रीची पहिली शत्रू आणि सखी ती स्वतः असते. नंतर तिच्या परीघातल्या दुसऱ्या स्त्रिया असतात आणि सरतेशेवटी पुरुष असतो.
मग लिंगभेदाचं एवढं अवडंबर कशासाठी? आपल्या मुली वाढविताना या One Of Its Kind पुस्तकात डॉ. विजया वाड ह्यांनी सूर्यप्रकाशाचं एक संपूर्ण आवर्तन आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीने वाचकांसाठी आणि खास करून मुलींच्या पालकांसाठी शब्दसमद्ध केलं आहे.
आपण चांगले पालक ठरलो, या आनंदाचा सूर्योदय मुलींच्या पालकांना मग रोज पहाटे दर क्षितीजांवर पाहायला नको.... तर या पुस्तकाच्या ओळखी नंतर तो सूर्योदय आपल्या मुलींच्या हृदयात आत्मबलरूपे तळपताना दिसेल असं विश्वास वाटतो..