Summary of the Book
आहार ही जगण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे, पण आहार कशा प्रकारे घ्यावा, किती घ्यावा, स्त्री-पुरुष, लहान मुले, वाढत्या वयाची मुले, तरुण, वृद्ध, बैठे काम करणारे, यानुसार आहार बदलत जातो. खेळाडू रुग्ण यांनाही वेगळ्या आहाराची गरज असते. जीवनशैलीनुसार स्वतंत्र आहार अत्यावश्यक असतो. आहारनीती कशी असावी, याचे सखोल मार्गदर्शन डॉ. मालती कारवारकर यांनी 'आहार सूत्र'च्या तीन भागांत केले आहे. आहाराचे पोषणमूल्य, उपयुक्त आहार सूत्र यामुळे आहाराविषयीचे गैरसमज दूर होतात. पैसा, यश मिळवण्याची धडपड सर्व जण करीत असतात. पण हे सगळे करायचे तर आरोग्य निरोगी, सशक्त हवे, हे विसरायला होते.
आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रथम आपला आहार सकस, पौष्टिक असायला हवा, हे सूत्र सांगून डॉ. मालती कारवारकर यांनी आहार सूत्र च्या भाग १,२,३, मधून पोषणमूल्य, बदलत्या जीवनशैलीनुसार बदलणारा आहार कसा असावा, याचे मार्गदर्शन केले आहे. आहारावर नियंत्रण ठेवून रोगांना दूर ठेवणे आवश्यक आहे.
यासाठी कोणते पदार्थ पोषक, कोणते घातक, त्यामुळे शरीरावर होणारे परिणाम, स्त्री पुरुषांचा आहार, हृदयविकाराविषयी धोकादायक गैरसमज व त्याचे स्पष्टीकरण, स्वभाव व आहाराचे नाते, डाएट, मुलांचा आहार,स्वादिष्ट व पोषक स्वयंपाक, साठीनंतर काय व कसे खावे, संधीवात, अस्थिरोग व आहाराचा संबंध, हार्मोन्सचे महत्व सांगितले आहे.
ज्योतिषशास्त्र व आहारशास्त्र, पोळी भाजीबरोबरच जेवणात आवश्यक पदार्थ, देशात विविध प्रदेशात सणानुसार केले जाणारे पदार्थ व त्यांच्या कृती, आहारशास्त्रातील घडामोडी, आहारशास्त्रामागचे शरीरशास्त्र, शाकाहार किंवा मांसाहार, नोकरदार स्त्रीचा आहार आदी अनेक बाबींची माहिती संपूर्ण दिली आहे..