Summary of the Book
जन्म व मृत्यू या मानवाच्या आयुष्यातील अटळ घटना आहेत. त्यामुळे या विषयी विशेषतः मृत्यूविषयी अनेक समज, गैसमज आहेत. पण स्वर्ग किंवा नरक कसा आहे हे कोणी जिवंतपणी सांगू शकत नाही. पण हा अनुभव जगभरातील काही लोकांना आला आहे.
त्यापैकी एक आहेत डॉ. एवन अलेक्झांडर. अमेरिकेत न्यूरोसर्जन असलेल्या डॉ. यांना २००८ मध्ये वयाच्या ५४ व्या वर्षी मेनिन्जायटिस या रोगाची लागण झाली आणि ते कोमात गेले. त्या काळात त्यांनी परलोकाचे दर्शन घेतले. शरीर, भाषा यांच्याविना तेथे चाललेल्या व्यवस्थेचे ते एक भाग बनले.
मृत्युपलीकडील अशरीर किंवा अपार्थिव जगाला 'हेवन' म्हटले जाते. डॉ. एवन अशा हेवनमध्ये फिरले. त्यांनी ती दुनिया अद्भुत वाटली. सातव्या दिवशी कोमातून बाहेर आल्यानंतर त्यांनी परलोकात अनुभव सांगितले. हा प्रवास त्यांनी 'प्रुफ ऑफ हेवन ' मध्ये सांगितला आहे.
तसेच डॉक्टर या नात्याने त्यांनी मेनिन्जायटिस, मेंदूवर होणारा त्याचा परिणाम विषयाची माहितीही दिली आहे. याचा मराठी अनुवाद अशोक पाध्ये यांनी केला आहे.