Hard Copy Price:
R 100
/ $
1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
डॉ. विठ्ठल प्रभू, एम्.बी.बी.एस्., एफ्.सी.जी.पी., एफ्.आय्.सी. हे काम-समस्या सल्लागार आहेत. काऊन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड (इंटरनॅशनल) या संस्थेचे ते मानद उपाध्यक्ष व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सेक्स एज्युकेशन, काऊन्सेलिंग, रिसर्च, थेरपी केंद्राचे मानद सल्लागार आहेत.
लैंगिकता शिक्षण व आरोग्य या विषयांवर त्यांनी एकूण 18 पुस्तके लिहिली असून त्यातील तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा `उत्कृष्ट मराठी वाङ्मय-निर्मिती पुरस्कार’ लाभला आहे. `निरामय कामजीवन’ व `यौवन ते विवाह’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. एवढेच नव्हे तर या पुस्तकांनी विक्रीचा उच्चांक गाठला आहे.
तेरा ते वीस हे वय जितके नाजूक तितकेच धोक्याचे म्हणून महत्त्वाचे. एकीकडे शरीरातील बदल सामावून घ्यायचे असतात, तर दुसरीकडे महत्त्वाच्या परीक्षांना तोंड द्यायचे असते. त्याचवेळी प्रेमाची चाहूलही अस्वस्थ करीत असते. तरुण मुलांमुलींच्या मनात स्वतःविषयी व विलिंगी व्यक्तीविषयी असंख्य प्रश्र्न उद्भवत असतात. या वयात त्यांना योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते. पण लैंगिकता हा विषय गूढ तितकाच अश्र्लीलही वाटतो, त्यामुळे यासंबंधी कुणाकेड विचारपूस करायची हा देखील प्रश्र्न असतो.
तरुण-तरुणींना जननेंद्रिये, मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती याविषयी माहिती हवी असते; तसेच प्रेम, संभोग, कौमार्य, कामपूर्ती याविषयी देखील माहिती हवीशी वाटते. याचबरोबर विवाहपूर्व गर्भधारणा, एड्स, गुप्तरोग, लैंगिक आगळीक टाळण्यासाठी मार्गदर्शनाचीही त्यांना गरज असते.
खास मुलींचे प्रश्र्न डोळ्यासमोर ठेवून ही आवृत्ती सुधारित केलेली आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने त्यांच्या मनातील कुतूहल शमेल, आत्मविश्र्वास वाढेल व त्यांच्या मानसिकतेला योग्य वळण मिळून पौगंडावस्थेची नाजूक अवस्था निर्वेधपणे पार पडू शकेल.