Summary of the Book
व्यवहारातील अनुभवावर चिंतनाने सुचलेले विचार व मार्गदर्शक आचार ह्या पुस्तकांमध्ये दिले आहेत. चाणाक्ष वाचकांच्या हे नक्कीच लक्षात येईल की हे विचार निरीक्षणाच्या मुशीतून बाहेर पडलेले आहेत. ते प्रत्येकाच्या जीवनात हरप्रसंगी उपयोगी पडण्यासारखे आहेत; आचाराला उपयोगी पडण्यासारखे आहेत; म्हणून ह्या ग्रंथाचे नाव ‘‘सदाचार चिंतनी’’ असे ठेवले आहे. विचारांचे स्वरूप व उपयोग व्यापक असल्याने समजातील सर्वच आबाल-तरुण-वृद्धांना ह्याचा उपयोग निश्चित होईल. हा चिंतनाने सुचलेल्या उत्तम विचारांचा संग्रह कोणत्याही प्रसंगी भेट देण्यास योग्य आहे.