Summary of the Book
उंच, शिडशिडीत देहयष्टी, देखणं, रूप असलेला एड सिल्वियाला उणिवांसह आवडायचा. पण ते बदलत गेले. त्याचे लहान मुलासारखे वागणे तिला पोरकटपणाचे वाटू लागले आणि पुढे त्यांचे नाते संपले.
तरी एड तिला भेटायला आला कारण ती कोमात गेली होती. त्या अवस्थेत असतानाही तिच्याशी संवाद साधत असताना त्याने आपल्याशी कशी निष्ठुर वागली हे त्याने सांगितले.
एडप्रमाणेच सिल्वियाची मुलगी कॅस्सी, बहीण जो, घरकाम करणारी टिया, रुग्णालयात तिची शुश्रुषा करणारी विनी, मैत्रीण कॅट हे सर्व जण कोमात असलेल्या सिल्वियाशी गप्पा मारत. या एकतर्फी संवादातून कोणते सत्य बाहेर येते हे डॉन फ्रेंच यांच्या 'ओs डिअर सिल्विया ' या कादंबरीत वाचायला मिळते.
रुग्णालयात निश्चल, स्तब्ध पडलेली सिल्विया या कादंबरीचे केंद्रस्थान असून, तिच्याभोवती अन्य पात्रांचे आयुष्य गुंफलेले आहे. तरी प्रत्येकाला स्वतंत्र आयुष्यही आहे. सिल्वियाशी बोलताना त्या प्रत्येकाचे कथन समोर येते व मानवी जीवनाचे वेगवेगळे पैलू यातून उलगडतात. याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे.