Summary of the Book
जागतिकीकरणाचा रेटा आज इतका प्रचंड आहे की, आपल्याला कोणत्याही एकाच गोष्टीवर विसंबून राहता येत नाही, भाषेच्या बाबतीतही ते खरं आहे.
आजच्या जागतिकीकरणाचा एक भाग म्हणजे आपल्या तरूण पिढीला नशीब काढायला जग मोकळं झालं आहे ! आता केवळ इंग्लिश येतं म्हणून फक्त अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियातच जायचं असं बंधन राहिलेलं नाही.
हिंमत असणा-यांना जर्मन शिकून युरोपात मुसंडी मारायची संधी आहे ! फ्रेंच शिकून पश्चिम युरोपात, उत्तर अफ्रिकेत किंवा कॅनडात जाऊन नशीब काढता येईल तर स्पॅनिश आल्यास अख्खी दक्षिण अमेरिका मोकळीच आहे ! मग आपल्या तरूण-तरूणींनी त्या संधीचा फायदा का घेऊ नये?
मराठी तरूणांना अशा संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आवश्यक ती माहिती आंइ साधनसामुग्री पुरवण्याचं काम कोणीतरी जबाबदारीनं करणं आवश्यक आहे, ते काम आम्ही करायचं ठरवलं आहे, त्या मालेतलं हे पहिलं पुष्प आहे !
जिज्ञासू आणि होतकरू मराठी तरूण आपल्या विकासासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जगात भरारी मारतील असा विश्वास आहे !