Summary of the Book
'सेल्फी हे स्वत:च माती खाण्यासारखे आहे,' यश हे नटीसारखं असतं. शेवटी कोणाच्या गळ्यात पडेल हे सांगता येत नाही.' अशा खुसखुशीत टिप्पणी किंवा 'माझा चुलतमित्र' अशी नामाभिधाने वाचावीत तर खास कणेकरी शैलीत. शिरीष कणेकर यांच्या प्रसन्न शैलीतील हा नवाकोरा विनोदी कथासंग्रह.
या पाकिस्तानचं काय करायचं? सलमान खान प्रभृतींना आवरा, कशास पचकता उगीच राव, पंखे हटवा आयुष्य वाढवा, पुणेकरांनो हेल्मेट घालताय?, तू मेरी गधी, मै तेरा गधा, भारत भुषणवर पुस्तक आदी चुरचुरीत, मिष्कील कथा हसवतात. 'अभिनयही भाकरीसारखा असतो. नुसतेच चटके नाही तर घणाचे घावही सोसावे लागतात,' असे भाष्यही ते सहजतेने करतात. आसपासचे जग, चित्रपट, टीव्ही, राजकारणी, साहित्यिक, क्रिकेट अशा कितीतरी विषयांवर या कथा आहेत.