माझी सैन्यगाथा
माझी सैन्यगाथा
एका सैनिकपत्नीची अनुभव गाथा
Pages: 220
Weight: 250 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 180 R 135 / $ 1.93
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
I love the man I married,
Soldiering is his life,
But I stand among the silent ranks,
Known as the- `ARMY WIFE…`


एका अज्ञात कवीने लिहिलेल्या या ओळी अगदी मोजक्या आणि समर्पक शब्दांत एका सैनिकाच्या पत्नीची ओळख करून देतात. प्रिया जोशी या अशाच एक सैनिकपत्नी आहेत. तसं पाहता सैनिकांबद्दल, त्यांच्या देशप्रेमाबद्दल सामान्य नागरिकांमधे बरीच जागरूकता आढळून येते; पण सैनिकाच्या कुटुंबियांच्या जीवनाबद्दल, त्यांना येणाऱ्या अनुभवांबद्दल मात्र आपण बऱ्याच वेळा अनभिज्ञ असतो.


लग्नाआधी संपूर्णत: सिव्हील लाईफ जगलेल्या आणि लग्नानंतर मिलिटरी लाईफचा अनुभव घेतलेल्या प्रिया जोशी यांनी या दोन वेगळ्या विश्वांतलं अंतर भरून काढण्यासाठी; सिविलीयन्सना मिलिटरीतील जीवनाची ओळख करून देण्यासाठी केलेलं स्वानुभवकथन म्हणजे हे पुस्तक- माझी सैन्यगाथा!

रात्रंदिन युद्धाचा प्रसंग जसा सीमेवरील सैनिकांसमोर असतो तसाच दूरवर त्यांचे घर सांभाळणाऱ्या पत्नीवरही कसा असतो ते येथे वाचायला मिळते.


हे पुस्तक वाचताना लेखिकेला भारताच्या कानाकोपऱ्यांत आलेले नानाविध अनुभव वाचताना आपणही त्यांत गुंतत जातो. या अनुभवांची व्याप्ती खूप मोठी आहे… कधी गमतीदार तर कधी लेखिकेची परीक्षा घेणारे; कधी मनाला सुखावणारे तर कधी माणुसकीची विविध रूपे दाखवणारे! मग ‘No news is good news!’ किंवा ‘I was alone but not lonely!’ अश्या विधानांमधील अर्थ आपल्याला समजतात, अंतर्मुख करून जातात.


प्रिया जोशी यांच्या पूर्वप्रकाशित ‘एक होता कॅन्सर’ या पुस्तकाप्रमाणेच त्यांचं हे ‘माझी सैन्यगाथा’ पुस्तकही वाचनीय आणि संग्रह करून ठेवण्यासारखं आहे!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat