Summary of the Book
सचिन तेंडुलकर या नावाचे गारुड तमाम भारतीयांच्या मनावर असल्याने त्याच्या व्यक्तिमत्वावर, कारकिर्दीवर लिहिण्याची इच्छा झाली नाही तरच नवल! सचिनच्या प्रेमातूनच प्रा. कृष्णकुमार गावंड यांनी हे पूस्तक संपादित केले आहे. २४ वर्षांची उत्तुंग कारकीर्द गाजवून स्काहीन निवृत्त झाला आणि त्याला पहिली भेट मिळाली ती भारतरत्न या सर्वोच्च किताबाची.
या सन्मानाला साजेशी बहारदार खेळी करणाऱ्या सचिनच्या बालपणापासूनच्या आठवणी पुस्तकात वाचायला मिळतात. कॉलनीतील सचिन, शाळेतला सचिन येथे भेटतो. सचिनचा शंभर शतकापर्यंतच्या प्रवासाचा धावफलक वाचायला मिळतो. सचिनचे गुरु, डॉन ब्रॅडमनने केलेले सचिनचे कौतुक, वानखेडे स्टेडियमवरील निवृत्ती आदी प्रसंगही सचित्र वाचयला मिळतात.