Summary of the Book
स्त्रीच्या आत्मभानाकडून आत्मसन्माना पर्यंत जाणार्या प्रवासाचं, त्यातील वळणवाटांवरील महत्वाच्या टप्प्यांचं सखोल विश्लेषण करणारं, बदलत्या काळाची स्पंदने टिपणारं एका अस्सल कार्यकर्तीच्या लेखणीतून उतरलेलं हे पुस्तक. या लेखनामागे अभ्यास व अनुभवाचं संचित असल्याने ते स्त्रीवादाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतं. लिंगभेद, स्वातंत्र्य, विस्तारलेला परीघ, आर्थिक भान, विविध सामाजिक संकेत, एकटेपणाचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करून वैचारिक आवर्तने घडवणारे हे लेख आहेत. त्यामागे कार्यकर्तीचा चेहेरा आहे त्यामुळे ते मनस्पर्शी व वास्तवदर्शी होतात.