आदिमाया, आदिशक्ती अशी देवीची अनेक रूपे आहे. माणसाला जगण्याचे बळ तिच्या आराधनेतून मिळते, अशी भावना आहे. देवीच्या उपासनेबद्दल 'श्रीदेवीदर्शन' मधून डॉ. सी. ग. देसाई यांनी मार्गदर्शन केले आहे. उपासना कशी करावी, का करावी व ती केल्यास काय फळ मिळते याचे विवेचन यात केले आहे. प्रथम सप्तशतीच्या कथा सांगितल्या आहेत. सुरथ राजा, समाधी वाणीची गोष्ट, महामायेची कथा, शुंभ- निशुंभाचा वध, देवीचरित्र पठणाचे माहात्म्य अशा १५ कथा आहेत. नंतर श्री दुर्गा सप्तशती आणि पाठ्विधी, श्रीदेवी अथर्वशीर्ष अथवा देव्यूपनिषद, ध्यानश्लोकसंग्रह, देवीचे प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्तीरहस्य, सप्तशतीचे काही सिद्ध सम्पुट मंत्र, शारदीय नवरात्र, नवरात्री उत्सव गीत, आरती व्रते, श्रीसूक्त, देवीची १०८ नामावली, देवीची उपनिषदे, देवीची १५ तीर्थक्षेत्रे, भारतातील देवीक्षेत्रे, देवीचे सण, प्रभावी देवीस्त्रोते यात आहेत. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा विधीचीही माहिती दिली आहे.
‘श्रीदेवीदर्शन’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5231511076786819777