Summary of the Book
अंतरिक्षाविषयी मानवाच्या मनात कायमच कुतूहल वाटत आले आहे. म्हणूनच खगोलशास्त्राचा अभ्यास प्राचीन काळापासून सुरू आहे. अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते. या अंतरिक्षातील ग्रह, तारे, सूर्य, सूर्यमाला, चंद्र, धूमकेतू याबद्दल तसेच तेथे घडणार्या घटना मानवाच्या कल्पनेच्या बाहेर आहे. अशा घटनांविषयी माहिती करून घेण्याची संधी मोहन आपटे यांचे ‘चला अंतरिक्षात’ हे पुस्तक वाचून मिळते. यात भारतीय प्राचीन काळातील खगोलशास्त्रापासून आधुनिक काळातील घडामोडींची माहिती आहे. अत्यंत रोचक व उत्कंठापूर्ण भाषेतील हे पुस्तक वाचकांना अंतरिक्ष सफर घडवून आणते.