Summary of the Book
पैसा हातात असला, की तो गुंतविण्याचा कल बहुतेकांचा असतो. यातून साधारण बँक, पोस्ट खाते याची निवड केली जाते. यात सुरक्षेचा भाग असला, तरी अशा गुंतवणुकीतून जादा मोबदला मिळत नसतो. यासाठी अन्य पर्याय कोणते, याविषयी अरुण गोडबोले यांनी 'गुंतवणूक मार्गदर्शिका आणि नोंदवही'मधून मार्गदर्शन केले आहे.
हाती असलेल्या पैशाची गुंतवणूक बँक, शेअर, म्युच्युअल फंड, फ्लॅट प्लॉट. आयुर्विम्यात करतो. या गुंतवणुकीची लेखी नोंद ठेवणे कसे आवश्यक आहे. हे प्रथम सांगून त्याची पद्धत दिली आहे. व्यक्तिगत माहिती, 'के. वाय. सी', लॅमिनेटेड प्रती. बचत का करावी, किती व कशी करावी, मृत्युपत्राची गरज याविषयी प्राथमिक मार्गदर्शन करून
नोंदवहीतील नोंदीचे मार्गदर्शन, बँक अकाऊंट, मुदत ठेवी, शेअर्स,म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी, आरोग्य विमा, वाहनांची नोंद व विमा, स्थावर मालमत्ता, सोन्या, चांदीचे दागिने, वस्तू यांची माहिती, मृत्यूपत्रातील माहिती, महत्वाची कागदपत्रे कोठे ठेवली त्याची नोंद, विम्याचे हप्ते कधी भरायचे, प्राप्तीकर अशा गोष्टींच्या लेखी नोंदी कशा कराव्यात, याची प्रत्येकाची नमुनापत्रिका यात दिली आहे.