Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अनुभवसमृद्ध अशा ज्ञानी गुरूला शरणागत होऊन, त्यांची सेवा करून जिज्ञासेने ज्ञान प्राप्त करून घ्यावे असे या गीतेच्या श्लोकात म्हंटले आहे. खंरतर सर्वात मोठा गुरु हा अनुभव आहे. त्याचे पुस्तक कोठे मिळत नाही आणि गुरुही सापडत नाही कारण ही ज्याची त्याची अनुभूती आहे. हे पुस्तक आणि गुरु दोघेही आपल्याच अंतरंगात दडलेले आहेत. अशा आपल्यातील ज्ञानाला शोधण्याचे आणि ते ज्ञान आत्मसात करण्याचे महत्वाचे काम सौ. विजया पाटील यांची 'ज्ञानगीता' करते आहे. प्रत्येक वर्तमानाची परिमाणे गीतेला लावावी लागतात तेव्हाच काळाबरोबर जगण्याचे युद्ध आपल्याला जिंकता येते. (जगण्याचे ज्ञान, जगण्याचे भान | देई ज्ञानागीता विजयाची ||) त्यामुळे आता वाचकाला स्वतःचा अंतर्वेध घेण्याची गरज नाही. ही परिपूर्ण ज्ञानगीताच त्याला गुरु होऊन प्राकृत जीवनाचा नवा अन्वयार्थ सांगेल. (कशाला रे हवी आरक्षण सूट? अंगीची हिम्मत दाखवावी ||) आजच्या विफल तरुण अर्जुनाला असा सडेतोड सवाल करणारी ही कावयित्री परिवर्तनशील असून हे नवे संस्करण समाजाच्या पुनरुत्थानासाठी मला खूप मोलाचे वाटते. सरळ स्पष्ट आणि अतिशय आस्वादक अशी ही भावविभोर श्लोक रचना सर्वांसाठीच प्रेरक आणि ऊर्जादायी आहे. ज्ञानगीता नावचं हे नवं चैतन्य घराघरात उजळावं त्याची आभा सर्वदूर पसरावी अशी मी आशा करतो. खरचं कोणालाही भेट देण्यासाठी या ज्ञानगीतेसारखं सुंदर पुस्तक नाही. विचारांचे धन खुशाल लुटावे, आनंदी करावे सकळ जना ||
ढासळत चाललेल्या मुल्यांची जपणूक करण्यासाठी पुन्हा गीता उघडण्याची वेळ आलीये. अशावेळी कवयित्री विजयाताई पाटलांची "ज्ञानगीता" आपल्याला आपलं जगणं आणि वागणं नेमकं कसं असावं हे अगदी सोप्या भाषेत सांगून जाते. अत्यंत वाचनीय असा हा काव्यसंग्रह आपल्या संग्रही असावाच.....