आचार्य विनोबा भावे यांची विचार मौक्तिके सतीशचंद्र यांनी संपादित केलेल्या या पुस्तकातून वाचायला मिळतात. विनोबांनी सांगितलेले तत्वज्ञान या पुस्तकात थोडक्यात एकत्रित स्वरुपात दिले आहे. हिंदुधर्म या विभागात भारताचा धर्मविचार, समन्वय दृष्टी आणि साधना; तसेच आध्यात्म या विषयांचा अंतर्भाव आहे. प्रस्थानत्रयी या उपविभागात वेद, उपनिषद, गीता यांच्याविषयीचे विचार समजतात.
'केवळ कर्म करू नका, ते अर्पण करा,''वाद सोडावा,' 'एकांतात सुखाने असावे,' अशी दैनंदिन आयुष्यात उपयुक्त ठरतील, अशी वाचणे पुस्तकात दिली आहेत. विनोबांनी संतांच्या कार्याची माहितीही चिंतनस्वरुपात सांगितली आहे. जगातील प्रमुख धर्माचे सार सांगताना 'धर्म प्रत्येक काळी, प्रत्येक समाजात एकच नसतो, परंतु अध्यात्म एकच असते,' असे ते म्हणतात. विनोबांच्या नजरेतून दिसणारे महात्मा गांधी येथे दिसतात. योगसूत्रे, अष्टांगयोग, ध्यान, कुंडलिनी या संबंधीचे त्यांचे विचारही समजतात.
‘भारतरत्न आचार्य विनोबा गाथा’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4698968768726283895